नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कॉंग्रेस प्रियंका गांधी बनारसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचार करत आहे. प्रियांका गांधींनी देखील याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. मात्र याबाबत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अंतिम निर्णय घेणार आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या महासचिव पदाची सूत्रे घेतल्यानंतर त्या राजकारणात अधिक सक्रिय झाल्या आहेत. त्यांना पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारी देण्यात आले आहे. ही जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियंका या उत्तर प्रदेशातील काँग्रेससाठी सातत्याने प्रचार करीत आहेत. गेल्या महिण्यात रायबरेली येथे एका कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला. तुम्ही रायबरेलीतून निवडणूक का लढवत नाही. तुम्ही निवडणूक लढविली पाहिजे. त्यावर प्रियंका गांधी यांनी उत्तर दिले, वाराणसीतून का नाही? मात्र, प्रियंका गांधी याचे उत्तर सहज मिश्किलीत दिले होते. त्यानंतर अंदाज बांधण्यात सुरुवात झाली आहे. प्रियंका गांधी खरोखरच वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणुकीची तयारी करत आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे.