आनंद शर्मा यांचा भाजपवर आरोप
मुंबई : राफेल घोटाळा झाला असून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठीच भाजप संसदेच्या संयुक्त चौकशी समितीला विरोध करत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केला आहे. मुंबई काँग्रेसच्या कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप सरकारने 2013 साली युपीए सरकारच्या काळात झालेला राफेल व्यवहाराचा करार मोडला. त्यामुळेच 108 ऐवजी केवळ 36 विमाने घेण्याचा निर्णय 2015 साली घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी सर्व तोडून मोडून सांगितले जात आहेत. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी चौकशी करणारी संस्था नाही. न्यायालयाने केवळ सरकारकडून तथ्ये मागितली होती. भाजप सरकारने ही तथ्येही न्यायालयात ठेवली नाहीत. त्यामुळे आम्ही संसदेच्या संयुक्त समितीच्या चौकशीची मागणी करत आहोत, असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
संसदीय समितीला पंतप्रधान मोदी यांच्यासह वायू सेनेतल्या वरिष्ठ अधिकार्यांनाही चौकशीला बोलावण्याचा अधिकार आहे. या चौकशीतच तथ्ये उघड होतील. भाजप सरकार या चौकशीला घाबरून संसदेच्या संयुक्त समितीला परवानगी देत नाही. अशी समिती नेमल्यास आगामी लोकसभेच्या आधी 15 मार्च पूर्वीच ही समिती आपला अहवाल सादर करेल, असेही शर्मा यांनी सांगितले.
काँग्रेस याप्रकरणी अद्याप न्यायालयात गेली नाही. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या विमानांच्या किंमतीबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. न्यायालयाने सरकारला या संदर्भातील काही तथ्ये सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सरकारने राफेल प्रकरणी न्यायालायचीच दिशाभूल केली आहे. केंद्र सरकारने काही कागदपत्र सादर केली.