मोदींनी केली ‘स्टॅचू ऑफ यूनिटी’वरील ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ परेडची पाहणी !

0

गांधीनगर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टॅचू ऑफ यूनिटी’वरील ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ परेडची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते.

भाजपा महिला मोर्चाचे आज गांधीनगरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. या अधिवेशनात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसहित नागरिकांपर्यंत सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती पोहोचविण्यावर चर्चा होणार आहे.