मोदींनी गरीबांचा पैसा उद्योगपतींना दिला-राहुल गांधी

0

धोलपूर- राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आले आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर होते. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी धोलपूर येथे गेले आहे. यावेळी राहुल पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदींनी गरिबांचा पैसा उद्योगपतींपर्यंत पोहोचवल्याचा आरोप त्यांनी केला. संसदेत मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अंबानी यांना ठेका का दिला असे विचारले, पण ते इकडे तिकडे पाहू लागले. एका युवकाच्या नजेरस नजर मिळवू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदींनी शेतकरी आणि गरिबांच्या खिशातील ४५ हजार कोटी काढून ते अनिल अंबानींना दिले. मी त्यांना ससंदेत अंबांनीना हे काम कसे दिले असे विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळल्याचा आरोप त्यांनी केला.

रोजगाराचे आश्वासन देताना राहुल म्हणाले, तुम्ही येथे सेल्फी घेत आहात. फोन पलटल्यानंतर तिथे मेड इन चायना लिहिलेले दिसेल. मला वाटते त्या जागी मेड इन धोलपूर किंवा मेड इन राजस्थान लिहिलेले असावे. मोदी तुम्हाला इथे रोजगार देत नाहीत. बँकेतील पैसा नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांना देतात आणि रोजगारी चीनला देतात. राजस्थानमध्ये येथील जनतेचे सरकार बनेल. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे सरकार असेल. भाजपावर निशाणा साधताना ते म्हणाले, आम्ही प्रेमाने काम करतो आणि ते तिरस्काराने काम करतात. ते ‘स्वत:च्या मन की बात’ करतात. पण आम्ही ‘तुमच्या मन की बात’ करतो, असा टोलाही लगावला.