मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा !

0

नवी दिल्‍ली: भारत-चीन सीमेवरील तणाव सातत्याने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जाऊन भारतीय जवानांचे मनोबल वाढविले. दरम्यान आज पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.