मोदींनी दिल्या या शब्दात मनमोहनसिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

0

नवी दिल्ली – देशाची माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. मनमोहनसिंग यांच्यावर काँग्रेससह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदीनीही डॉ. मनमोहनसिंग यांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या माजी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दिर्षायुष्यासाठी प्रार्थना करत असल्याचे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सन 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीत मनमोहन सिंग यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. युपीए सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, मनमोहनसिंग यांची प्रतिमा आजही प्रामाणिक, पारदर्शी आणि दूरदृष्टीचा नेता अशीच आहे. वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात त्यांचा उत्साह कायम आहे. तर त्यांचा सहज आणि साधेपणा नागरिकांना नेहमीच भावतो.