मोदींनी देशात अंबानी आणि शेतकरी असे दोन ‘हिंदुस्थान’ तयार केले-राहुल गांधी

0

नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वांरवार शाब्दिक हल्ला करत असतात. आज देखील त्यांनी मोदींवर निशाना साधला. मोदी सरकारच्या कृषी विषयक धोरणावरून त्यांनी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हिंदुस्थान बनविले आहे. एक अनिल अंबानीसाठी व एक शेतकऱ्यांसाठी असे दोन हिंदुस्थान मोदींनी बनविले आहे अशी खरमरीत टीका मोदींनी केली.

एका बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी ७५० किलो कांद्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला फक्त १०४० रुपये मिळाले, यावरून शेतीमालाला काय दर आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला.

मोदींनी बनविलेला अनिल अंबानीसाठी एक हिंदुस्थान आहे, ज्यात काहीही न करता अंबानीला राफेलच्या माध्यमातून ३० हजार कोटी दिले. दुसरीकडे शेतकऱ्याला काहीही देत नाही.