निवडणुकीच्या निकालावरून मोदींनी साधली चुप्पी !

0

नवी दिल्ली- आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दरम्यान देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पूर्ण देशाचे लक्ष पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. भाजपाला खूप मोठा धक्का बसणारे निकाल हाती येण्याची शक्यता असून काँग्रेसची वापसी होण्याची शक्यता आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र निवडणुकीच्या निकालांवर बोलणे स्पष्टपणे टाळले. यावरुन भाजपामध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

अधिवेशनात जास्तीत जास्त लोकहिताची कामे करु. सर्व सदस्य या भावनेचा आदर करत पुढे जातील अशी अपेक्षा आहे. सरकार जनहितार्थ अनेक विधेयके आणणार असून यावर चर्चा व्हावी. वाद, विवाद होत असले तरी संवाद झालाच पाहिजे असं नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.