लखनौ-पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी ते आजमगड येथे गेल, त्यानंतर सायंकाळी वाराणासीमध्ये दाखल झाले. रात्री अचानक गेस्ट हाऊसमधून ते निघाले आणि बनारस हिंदू विद्यापीठाचा फेरफटका मारला. जवळपास तब्बल तासभर मोदींनी या परिसराची पाहणी केली.
पंतप्रधान मोदी येथील डिरेका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. पण रात्री गाडी काढून ते थेट बनारस हिंदू विद्यापीठात पोहोचले. त्यांनी विद्यापीठ परिसरातील विश्वनाथ मंदिरात पूजा- अर्चा केली. यावेळी त्यांनी शहरातील विकास कामाचीही पाहणी केली. बनारस हिंदू विद्यापीठातील विश्वनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर लंका, गुरुधाम, रविंद्रपुरी, भेलूपूर, मदनपुरा, गोदौलिया, चौक, मैदागीन, लहूराबीर, अंधरापूल, आंबेडकर चौक, सर्किट हाऊस, नदेसर, कँट रेल्वे स्टेशन आणि लहरतारा परिसराला फेरफटका मारून पुन्हा गेस्ट हाऊसला आले. यावेळी त्यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील होते.