मोदींनी शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली: शरद पवार

0

एरंडोल-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत मोठ-मोठी आश्वासने दिली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते, मात्र सत्तेत येऊन पाच वर्ष उलटले मात्र शेतकऱ्यांचा विकास मोदींनी केला नाही. मोदींनी शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज एरंडोल येथे आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारवर टीका केली.

शेतीमालाला योग्य दर मिळावा, मुलांचे शिक्षण योग्य पद्धतीने व्हावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र यापैकी काहीही होतांना दिसत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचा मोठा प्रश्न आज आहे. पद्मालय, लोंढे, अंजनी सिंचन प्रकल्प बंद अवस्थेत आहे, आणि सरकार विकासाच्या गप्पा मारत असल्याचे आरोप पवार यांनी केल