चंडीगड: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत-चीन वादावरून सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. चीनने भारताच्या जमिनीवर अतिक्रम केले आहे. भारताची जमीन चीनने बळकावली आहे. मात्र ही वस्तुस्थिती मोदी मान्य करायला तयार नसून देशाला खरे काय? ते सांगत नाहीये. मोदींना स्वत:च्या प्रतिमेची चिंता आहे. चीनने भारताची भूमी बळकावली आहे हे जर मोदींनी सांगितले तर त्यांच्या प्रतिमेला धोका निर्माण होईल ही गोष्ट चीनला माहित असल्यानेच त्यांनी भारताच्या १२०० स्क्वेअर मीटर जमिनीवर ताबा मिळविला आहे. स्वत:च्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत मातेशी दगाबाजी करत आहेत असे घणाघाती आरोप कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.
#WATCH Do you know why China was able to take away a part of our land? It is because China knows that the person who is sitting at the top position, just cares about his image: Congress leader Rahul Gandhi in Patiala, Punjab pic.twitter.com/MjY94cnFyl
— ANI (@ANI) October 6, 2020
भारतीय सैन्य दलातील कोणत्याही सैनिकाला, अधिकाऱ्याला विचारा, ते चीनने भारताची भूमी बळकावली आहे हेच सांगतील असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
कृषी विधेयकाला कॉंग्रेसने विरोध केला आहे, या विधेयकाविरोधात कॉंग्रेसने देशभरात आंदोलन छेडले आहे. पंजाबमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शेतकरी आंदोलन झाले.