मोदींसोबत काय झाली चर्चा?; उद्धव ठाकरेंनी दिली माहिती !

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

या भेटीमध्ये चांगल्या विषयावर चर्चा झाली. राज्याच्या आवश्यक घटकावर पंतप्रधानांसोबत चर्चा केली. राज्याच्या विकासासाठी राजकारणापासून दूर राहण्यासाठी मोदींनी सकारात्मकता दर्शवित सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

मोदींसोबत एनआरसी, सीएएवर देखील चर्चा केली असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. एनआरसी आणि सीएएमुळे कोणालाही घाबरण्याचे कारण नाही असेही त्यांनी सांगितले.

जीएसटी परतावा पाहिजे तेवढा मिळत नसल्याचे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले त्यांनी त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.