मुंबई: आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून राज्यात गदारोळ सुरु असताना, भाजपाच्या मंत्र्यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाजारांचा सन्मान असल्याची मुक्तफळे भाजप नेत्यांने उधळली आहेत. भाजपाचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मुक्ताफळे उधळली आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठा वाद होण्याची चिन्हे दिसत आहे.
‘नरेंद्र मोदी हेच शिवाजी’ असे सांगणाऱ्या लेखकावर कारवाई का झाली नाही? पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भाजपातून एव्हाना हाकलून का दिले नाही ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मुक्ताफळे उधळली आहे.
हळवणकरांनी महाराजांनी केलेले काम आणि पंतप्रधान मोदी करत असलेल्या कामकाजात साधार्म्य असल्याचा दावा केला. मोदी राबवत असलेल्या योजनांचे दाखले देत आपल्या वक्तव्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न हळवणकर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा नवीन वाद उफळण्याची शक्यता आहे.