मोदी आज प्रचारासाठी वर्ध्यात !

0

वर्धा- लोकसभेसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात जाहीर सभा होत आहे. स्वावलंबी मैदानावर सभा होणार आहे. जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक पंतप्रधानांनी सेवाग्रामला भेट देऊन बापू कुटीचे दर्शन घेतले आहे. मात्र पंतप्रधान मोदी आज सेवाग्रामला भेट देणार नसल्याचे सांगितले जात आहे. नरेंद्र मोदी यांनीही २०१४च्या निवडणूक काळात वर्धा येथे सभेनिमित्त आले असता सेवाग्रामला भेट दिली होती. यावेळी त्यांचा सेवाग्राम दौरा नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मोदी हे सेवाग्रामला येणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. पण, आता ते येणार याविषयीची माहिती देण्यात आलेली नाही’, असे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आ. एन. प्रभू यांनी सांगितले.