मुंबई- आज पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. जवळपास सर्वच जागांचे कल हाती आले आहे. त्यानुसार काँग्रेसने आघाडी घेत बहुमत मिळविले आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. देशात मोदी आणि भाजपाची वागणूक जशी होती त्यामुळे हे होणारच होते. त्यामुळे मी पाच राज्यातील जनतेचे अभिनंदन, त्यांनी यानिमित्त चांगला पायंडा पाडला. त्यामुळे पप्पू आता परमपूज्य झाला, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.