नंदुरबार: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबारमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेत आहे. यावेळी बोलतांना मोदींनी कॉंग्रेसवर सरसंधान साधत आदिवासी समूहासाठी सरकारने केलेल्या कामगिरीचा पाढा वाचला. कॉंग्रेसकडून सरकार आदिवासींच्या आरक्षणाला आणि जमिनीला धक्का लावत असल्याचे आरोप केले जात आहे. मात्र मी आदिवासी जनतेला आश्वस्त करतो की जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत आदिवासींचे आरक्षण आणि जमिनीला धक्का लागू देणार नाही असे मोदींनी यावेळी सांगितले. कोणताही पंजा तुमच्या जमिनीला हात लावणार नाही असे म्हणत मोदींनी कॉंग्रेसवर टीका केली. २९ रोजी नंदुरबार आणि धुळे येथे मतदान होत आहे.
आदिवासी क्षेत्रातील जनतेसाठी सरकार मोठा प्रमाणात कामगिरी करत आहे. तुमच्या हक्काचे पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यात जमा होत आहे. कुपोषणाशी लढण्यासाठी व्यापक काम आम्ही करतो आहे. आरोग्य क्षेत्रात आदिवासी नागरिकांना खर्च करू लागू नये म्हणून पाच लाखांपर्यंत मुफ्त सुविधा या चौकीदाराने दिली आहे असे मोदींनी यावेळी सांगितले.
उमेदवारांच्या नावाचा उल्लेख नाही
मोदींनी नंदुरबारला महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ.हीना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. मात्र सभेत त्यांनी खासदार गावित यांच्या नावाचा कोठेही उल्लेख केलेला नाही. या सभेत मोदी नंदुरबारसाठी मोठी घोषणा करतील अशी अपेक्षा होती मात्र ती त्यांनी केलेली नाही. या सभेत रिपाईच्या व्यासपीठावर स्थान देण्यात आला नाही त्यामुळे पदाधिकार्यांनी बहिष्कार टाकला.