नवी दिल्ली – देशातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना एक विशेष संदेश देणार आहेत. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि राज्यांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे ते जाणून घेतले. आता मोदी उद्या देशाला संबोधित करणार आहेत.