मोदी चहा विकत होते, तिथे पर्यटनस्थळ नाहीच!

0
चहा विकणारा पोरगाही पंतप्रधान होऊ शकतो हे लोकांसमोर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकत असलेली टपरी पर्यटनस्थळ बनविण्याची कल्पना नुकतीच मांडण्यात आली होती. एरव्ही सुस्त असणारी सरकारी यंत्रणाही उत्साहाने या कामाला लागली होती. परंतु केंद्र सरकारने टपरी विकास पर्यटन योजना विचाराधीन नसल्याचे सांगून टपरी समर्थक आणि विरोधक या दोघांनाही निराश केले आहे.
मोदी बालपणी गुजरातमधील वडनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवरील टपरीवर चहा विकीत. ही टपरी व रेल्वे स्टेशन  प्रेरणास्थान म्हणून विकसित करण्याठी पर्यटन मंत्रालय विचार करीत होते. त्यासाठी रेल्वे मंत्रालयालाही विचारण्यात आले होते. आता मात्र पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात अशी कोणतीही योजना नाही व त्यासाठी निधीची तरतूदही केलेली नाही असे सांगितले.