मोदी देशाचे नाही तर अंबानीचे चौकीदार:राहुल गांधी

0

सुपाउल: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज बिहारमधील सुपाउलमध्ये प्रचारसभा घेत आहे. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. देशाचे पंतप्रधान स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणत आहे. परंतु ते देशाचे चौकीदार नसून फक्त अनिल अंबानीचे चौकीदार आहेत अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली.

पूर्ण देशात बिहारी तरुण बँक, सरकारी कार्यालयासमोर चौकीदारी करत आहे. या संपूर्ण चौकीदारांना बदनाम करण्याचे काम मोदींनी केले आहे अशी टीका राहुल गांधींनी केली.