मोदी मंत्रिमंडळात ‘यांचा’ समावेश आश्चर्यकारक !

0

नवी दिल्ली: काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काल ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळातील काही चेहरे हे आश्चर्यकारक ठरले. मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक आश्चर्यकारक निवड ठरली ती माजी परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांची. एस. जयशंकर हे 1977 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. सतत कुरघोड्या करणाऱ्या चीन सोबत संबंध सुधारणे आणि अमेरिकेसोबतचे संबंध मजबूत करण्यामध्ये यांची महत्वाची भुमिका आहे. डोकलाम विवादावेळीही जयशंकर यांची मध्यस्थी कामी आली होती. 2012 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी चीनला गेले होते, तेव्हा त्यांची भेट झाली होती. जयशंकर हे अनेक देशांसोबतच्या कूटनीतीमध्ये हिस्सा झालेले आहेत.

प्रताप चंद्र सारांगी बालासोरचे खासदार आहेत. त्यांना राज्यमंत्री बनविण्यात आले आहे. त्यांना ओडिशाचा मोदी म्हटले जाते. अतिशय साधी राहणीमान असलेले प्रताप चंद्र सारंगी हे समाजसेवेत अग्रेसर आहेत. सायकलवरून प्रवास करणारे आणि कच्च्या घरामध्ये राहणारे सारंगी 2004 आणि 2009 मध्ये आमदार राहिलेले आहेत. त्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, हरले होते.