मोदी मन की बात जनतेवर लादतात : राहुल

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेची मन की बात न ऐकता स्वत:ची मन की बात देशावर लादतात, अशा टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर केली. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करुन देश चालवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

प्रोफेशनल काँग्रेसची निर्मिती करणार
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसला देशातील सर्वांचा आवाज राजकारणात आणायचा आहे. मात्र भाजपला सर्वसामान्यांचा आवाज राजकारणात नको आहे. देशातील सर्व जनतेचा धोरण आखणीच्या प्रक्रियेत सहभाग असावा, असे काँग्रेस पक्षाला वाटते. त्यामुळेच यासाठी एक नवी आघाडी पक्षाकडून सुरु करण्यात येणार आहे. धोरण आखणीच्या प्रक्रियेत देशातील कोट्यवधी जनता सहभागी व्हावी, यासाठी प्रोफेशनल काँग्रेसची निर्मिती केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाकडून असंघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी प्रोफेशनल काँग्रेसची उभारणी केली जाणार आहे. या माध्यमातून असंघटित कर्मचार्‍यांचा आवाज राजकारणात पोहोचणार आहेे. प्रोफेशनल काँग्रेसची धुरा चार वरिष्ठ काँग्रेस नेत्यांकडे असणार आहे. यामध्ये शशी थरुर आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असेल. असे राहुल गांधी म्हणाले.