मोदी या पुढे थापा मारणार नाही: रामदास आठवले

0


नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी जी काही आश्वासन दिली होती, ते पूर्ण करण्यासाठी मोदींना अजुन पाच वर्षाचा काळ लागेल आणि नंतर मग सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करतील, नंतर ते पुन्हा थापा मारणार नाही असे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

आज नांदेड येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असता पत्रकारांना सांगितले.
त्यांनी राज्यातील दुष्काळ गंभीर असून या दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करत असल्याचे सांगितले.दुष्काळ निवारण्यासाठी केंद्राकडून मोठी मदत केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळ निवारण्यासाठी राज्यात सिंचन क्षेत्र, तसेच शेतीला जोडधंदा, नव्या उद्योगांची उभारणी आवश्यक असल्याचे सांगितले.

राज्याला दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयाचा निधी मिळाला असल्याचे ट्वीट मुख्यमंत्री यांनी केले होते, पण प्रत्यक्षात ही मदत मिळाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्यमंत्री हे मोदीच्या पावलावर चालत आहे का ? असे विचारल्यावर त्यांनी मोदी यांनी जी आश्वासन दिली होती, त्या साठी अजून पाच वर्षाचा काळ लागेल आणि पुन्हा ते थापा मारणार नाही असे सांगितले.