मोदी सरकारचा बँकिंग क्षेत्रात मोठ्या फेरबदलाचा निर्णय; या बँकांचे होणार विलीनीकरण

0

नवी दिल्ली-सरकारने बँकिंग क्षेत्रात मोठ्या फेरबदलाची घोषणा केली आहे. सरकारने बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँकेचे आपापसात विलीनीकरण करण्यात येणार आहे. बँकेचे आकार वाढविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे कारण बँकेचे आकार वाढल्यास कर्ज वाटप देखील वाढेल असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. बँकेचे विलीनीकरण होणार आहे मात्र अद्याप कालावधी निश्चित नसल्याचे देखील अर्थमंत्र्यानी सांगितले आहे. बँक आपापसात विचार विनिमय करून निर्णय घेणार आहे.

यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवानगी घेण्यात आली आहे. बँकेच्या या विलीनीकरणाचा कोणताही परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार नाही. नोकरी तसेच सेवाशर्थी यावर कोणतेही परिणाम जाणवणार नाही असे अर्थमंत्र्यानी सांगितले आहे.