मोदी सरकारने सीबीआयला आपली ‘प्रायव्हेट आर्मी’ बनवली – काँग्रेस

0

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश सरकारने सीबीआय संदर्भात जारी केलेला आदेश गंभीर आहे असे सांगत मोदी सरकारने देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेला ‘प्रायव्हेट आर्मी’ बनवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारनेही  सीबीआयला राज्यात छापेमारीसाठी तसेच तपासासाठी देण्यात आलेली सामान्य परवानगी शुक्रवारी मागे घेतली.

पक्षाचे नेता पवन खेडा म्हणाले की, हे खूप गंभीर प्रकरण आहे. ज्या दोन किंवा अडीच लोकांनी सीबीआय आणि अशा प्रकारच्या संस्थांना आपली ‘प्रायव्हेट आर्मी’ बनवली आहे. याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. गेल्या साडेचार वर्षांत देशातील संस्थांची आपण काय परिस्थिती करुन ठेवली आहे, याचा मोदी सरकारने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. सीबीआय एक ‘प्रायव्हेट आर्मी’ असल्याची एक छबी बनली आहे. जर यात सुधारणा झाली नाही, तर देशासाठी हा मोठा धोका असल्याचेही खेडा म्हणाले.