मोदी सरकारविरोधात पहिला गियर माझा

0

मुंबई-गुढीपाडव्याला झालेल्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे सांगितले होते. मोदी सरकारविरोधात पहिला गियर मीच टाकला, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांच्या आघाडीचे श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांच्या महाआघाडीत सामील होणार का, याबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी रत्नागिरीचा दौरा केला. सकाळी त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी रत्नागिरीत कोकण कृषी मंचाला भेट दिली. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी विरोधकांच्या एकजुटीबाबत भाष्य केले. गुढीपाडव्याला झालेल्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले होते, असे त्यांनी सांगितले. विरोधकांची एकजूट गरजेची असल्याचे संकेत त्यांनी यातून दिले. या महाआघाडीत मनसेचे स्थान काय, याबाबत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे.