मोदी सरकार आमच्याविरोधात कट रचत आहे-केजरीवाल

0

नवी दिल्ली-आयएएस अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्याचे आदेश उपराज्यपालांनी द्यावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आयएएस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भाजप, मोदी सरकार आमच्याविरोधात हा सगळा कट रचत असल्याचा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले आहे. पंतप्रधान मोदींनी हा अधिकाऱ्यांचा संप घडवून आणल्याचा अप्रत्यक्ष आरोप केजरीवालांनी मोदींवर केला.

अघोषित संप मिटवा
जो पंतप्रधान एखाद्या राज्यात अधिकाऱ्यांचा संप घडवून तेथील कामकाज ठप्प करत असेल, अशा पंतप्रधानांच्या हातामध्ये देशातील लोकशाही सुरक्षित आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे. रविवारी सकाळी त्यांनी याबाब ट्विट केले. आयएएस अधिकाऱ्यांचा अघोषित संप मिटवा, काम न करणाऱ्या अधाकाऱ्यांविरोधात कारवाई करा आणि गरीबांच्या घरी रेशन पोहोचवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी या केजरीवालांच्या मागण्या आहेत.

आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह ते उपराज्यपालांच्या कार्यालयात सात दिवसांपासून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, दिल्लीचे नायाब राज्यपाल अनिल बैजल यांनी शनिवारी चार बिगर भाजपा शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी नाकारली. दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या चार बिगर भाजपा शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी नायाब राज्यपाल अनिल बैजल यांनी शनिवारी नाकारली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिल्लीच्या नायाब राज्यपालांकडे केजरीवालांना भेटण्याची परवानगी मागितली होती. पण ही परवानगी नाकारण्यात आली.

चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा 

केजरीवाल यांना समर्थन देण्यासाठी चार राज्यांचे मुख्यमंत्रीही मैदानात उतरले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी या चारही मुख्यमंत्र्यांनी उपराज्यपालांकडे परवानगी मागितली. मात्र उपराज्यपालांनी भेटण्यासाठी परवानगी नाकारली.