नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याची घोषणा केली. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्राने उज्ज्वला योजनेअंतर्गत ५ कोटी ८६ लाख लोकांना कनेक्शन दिले आहे.
ज्या कुटुंबीयांकडे कनेक्शन नाही त्यांनाच लाभ मिळणार आहे. कागदपात्रांची पूर्तता केल्यानंतर याचा लाभ मिळणार आहे.