मोदी सरकार सर्वंच आघाड्यांवर संपूर्ण अपयशी

0

जळगाव । मोदी यांनी निवडणूकीत अच्छे दिनची घोषणा केली होती. त्यांच्या केंद्रात सत्ता स्थापनेच्या तीन वर्षांत एखाद्या मृगजळासारखी ठरल्याची टिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील यांनी केली. मोदींच्या सत्ता स्थापनेच्या काळात या सरकारने काय दिले? शेतकर्‍यांना ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवून ‘बुरे’ दिवस आणले. मोदी सरकारचा तीन वर्षांचा आढावा घेतल्यास या सरकारचा घोषणांचा सुकाळ, अंमलबजावणीचा दुष्काळ दिसून आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तीन वर्षांचा कार्यकाळात बेरोजगारी, शेतकरींचा प्रश्‍न, महिलांची सुरक्षा याबाबत अपयशी ठरले आहे. सत्तेत राहून शिवसेना शेतकर्‍यांची फसवणूक करित आहे. तसेच शेतकर्‍यांबद्दल शिवेसेनेला खरीच आस्था असेल तर सरकार बाहेर पडावे, हिम्मत असेल तर 9 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या समोर आंदोलन करण्याचे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

मोदी सरकार विरोधात आंदोलने करणार
पुढे बोलतांना भाऊसाहेब म्हणाले की, सत्तेत राहुन शिवसेना भगवा सप्ताह साजरा करत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांसांठी उभे राहणार्‍या राहुन आंदोलन करित असल्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक करित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, शहर कार्यध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, काँगे्रस युवक अध्यक्ष देवेंद्र मराठे, सुरेश पाटील, अशोक खलाणे, उमेश पाटील, सरचिटणीस अजबराव पाटील, सुखलाल महाजन आदी उपस्थित होते.सरकारच्या तीन वर्ष पुर्णचा गुणगौरव करत आहे. परंतु प्रत्यक्षात काय मिळाले? 15 लाख प्रत्येक खात्यात येणार होते, दोन कोटी दरवर्षी बेरोजगारांना रोजगार मिळणार होता. तूरदाळीसंदर्भात प्रचंड लूट झाली अशा अनेक कारणांनी या सरकारने 100 टक्के फसवणूक केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. काँग्रेसच्या काळात विविध योजनांचा शुभारंभ होऊन आता फक्त फित कापण्याचे काम हे सरकार करित असल्याचे सांगितले. अशा प्रकारे सर्व वर्गातून या सरकारविरोधात नैराश्य, अपयश आले आहे. त्यामुळे यापुढे आम्ही या सरकारविरोधात आंदोलने, निर्दषने करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.