मोदी सरकार हे हुकूमशाहीचं सरकार – राहुल गांधी

0

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार हे हुकूमशाहीचं सरकार असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. छत्तीसगडमध्ये पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बोलत होते.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ ट्विट करत राहुल यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हुकूमशाही ही भाजपची वृत्ती होत चालली आहे. रमण सिंह सरकारद्वारे झालेल्या या मारहाणीला जनता राजकीय हुकूमशाहीच्या रुपात स्मरण करेल, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी केलेल्या या मारहाणीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अटल श्रीवास्तव जखमी झाले आहेत. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमर अग्रवाल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना कचरा संबोधून वाद ओढवून घेतला होता. या निषेधार्थ अग्रवाल यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.