नवी दिल्ली:२०१७च्या गुजरात निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांनी मोदी हा नीच प्रकारचा माणूस आहे हे विधान केले होते, त्यावरून भाजप आणि कॉंग्रेस मध्ये खूप वाद पाहण्यास मिळाले होते. पुन्हा एकदा अय्यर यांनी मोदींना नीच म्हटले आहे, त्या मुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एका लेखाद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक असताना अय्यर यांनी हे विधान केल्याने कॉंग्रेस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
‘मोदी हा नीच प्रकारचा माणूस आहे, असे विधान मी २०१७ च्या गुजरात निवडणुकीच्या वेळी केले होते आणि ते विधान बरोबर असल्याचा निर्वाळा देत आपली त्यावेळेची भविष्यवाणी
खरी असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वक्तव्यावरून कॉंग्रेसने अय्यर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती, कॉंग्रेस आता नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.