अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा केला आरोप
मुंबई : रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संस्थापक पदावर राध्येश्याम मोपलवार यांची फेरनियुक्तीवर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत आक्षेप घेतला. तसेच वादग्रस्त अधिकारी मोपलवार यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असताना पुन्हा नियुक्ती कशी करण्यात आली? एकनाथराव खडसेंचा अहवाल अजून समोर येत नाही मात्र या अधिकाऱ्याला बुलेट ट्रेनच्या गतीने कशी काय क्लीन चीट मिळते? असा सवालही विखे पाटील यांनी यावेळी केला. यावर चर्चेसाठी विरोधी पक्षनेत्यांनी ठेवलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला.
हे देखील वाचा
अधिकाऱ्याच्या मालमत्तेवर सवाल
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, चौकशी समितीचा अहवाल सभागृहात पटलावर ठेवला नाही. बॉलिवूडचा नट आणून आवाज काढण्यात आला असा दावा चौकशी समितीसमोर करण्यात आला. मात्र, ध्वनिफितीतून मिळालेल्या माहितीत या अधिकाऱ्याची किती मालमत्ता आहे, किती माल कमावला याची चौकशी तरी केलीय का? भाजपच्या आमदाराने या सर्व प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाला पुरवली आहे. तरी अभय दिला जातो याचा अर्थ वरपासून खालपर्यंत सर्वांनीच त्यांना वाचवण्याचे ठरवले असा होता, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.