मोपवारांसह आठ सनदी अधिकाऱ्यांची बाेगस कंपनीत गुंतवणूक!

0

मुंबई: राज्यभरात गाजलेल्या कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राधेश्याम मोपलवारांसह आठ सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या तसेच नातेवाईकांच्या नावाने कोलकात्याच्या अरनाॅल्ड होल्डिंग या बाेगस कंपनीत गुंतवणूक करत काळे पैसे पांढरे केल्याचा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला. मोपलवार यांच्यासह सुरेश काकानी, विजय नहाटा, विजय अग्रवाल, सतीश सोनी, चुनीलाल चंदन, शेखर चन्ने, किरण कुरूंदकर या सनदी अधिकाऱ्यांनी बोगस कंपनीत गुंतवणूक केली असल्याचा आरोप गोटे यांनी करत खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत गोटे यांनी मोपलवारांची चौकशी करावी, यासाठी आपण पंतप्रधान कार्यालयापासून ते केंद्रीय गुन्हे तपास यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा कसा केला याबद्दल माहिती पत्रकारांना दिली.

मोपलवार पापी बाळ
गोटे यांनी यावेळी मोपलवार व विजय कुरूंदवार यांच्यासह समृद्धी महामार्ग प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अनेक अधिकारी असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला. मोपलवार हे काँग्रेस आघाडी सरकारने पोसलेलेे लाडके पापी बाळ आहे. तेलगी प्रकरणातील मुळ सुत्रधारही मोपलवार असून चौथे लग्न करण्यासाठी ितसऱ्या पत्नीच्या घटस्फोटाला ३२ कोटी िदले होते. त्यांच्या विरोधात १५ िडसेंबर २०१६ ला औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचवेळी मोपलवारांवर कारवाई झाली असती तर या अधिकाऱ्याची आणखी भ्रष्टाचार करण्याची िहंमत झाली नसती, याकडे गोटे यांनी लक्ष वेधले. मोपलवार यांच्यासह आठ अधिकाऱ्यांनी कलकाता येथील सतत तोट्यात असलेली अर्नाल्ड कंपनी विकत घेेतली. सर्व अधिकाऱ्यांनी आपली पत्नी,मुले व मुली व स्वत:च्या नावे सदर कंपनीत गुंतवणूक करून लाखोंचा फायदा मिळवला. माेपलवारांच्याच नेतृत्वाखाली सनदी अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शेकडो रूपयांची गुंतवणूक करून बेहीशोबी संपत्ती पांढरी करण्याचे काम केले. ही ब सबळ पुराव्यासह २०१६ च्या नागपूर अधिवेशनात आपण मांडली होती, असे गोटे यांनी म्हणाले.

अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मोदींना घालणार साकडे
गोटे यावेळी म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नेत्यांवर तातडीने कारवाई केली जाते. अशीच तत्परता भ्रष्ट सनदी अधिकाऱ्यांबाबत होताना दिसत नाही. यामुळे भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी फक्त भ्रष्ट मंत्री बदलून चालणार नाही, तर भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे,अशी मागणी आपण पंतप्रधान मोदींकडे करणार आहे, असे गोटे यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री व मुख्य सचिव कारवाई का करत नाहीत? असे विचारले असता गोटे म्हणाले, या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री व मुख्य सचिवांनी द्यायला हवे. मी तीन महिन्यांपूर्वी सर्व कागदपत्रांसह मोपलवारांच्या भ्रष्ट कारभाराचा पंचनामा फडणवीस यांच्यासमोर केला होता. यामुळे मुख्यमंत्र्यांनाही धक्का बसल्याची माहिती गोटेंनी दिली.