हडपसर । डॉ बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिन व लोकेनते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रामटेकडी येथील हनुमान मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.
मानव सेवा संघ, प्रकृती केअर फाउंडेशन, अनुलोम यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती भूषण तुपे, फुलचंद चाटे, संतोष पाटील, मानव सेवा संघाचे अध्यक्ष भगत सिंग कल्याणी, राजू दिवटे, शक्ती सिंग कल्याणी, मख्खनसिंग कल्याणी, कन्हैया सिंग कल्याणी, अर्जुन कांबळे, गणेश जाधव, संतोष जगताप आदी उपस्थित होते.डॉ. ज्ञानोबा मुंडे, डॉ. मुस्तफा, डॉ. आश्विनी लोखंडे प्रकृती केअर फाउंडेशनच्या शिवकन्या बारगजे, बाळासाहेब माने, दत्तात्रय बारगजे, सुभाष मुंडे, फिरोज तांबोळी मानव सेवा संघाचे अध्यक्ष भगत सिंग कल्याणी गोपीनाथराव मुंडे मेमोरियल हेल्थ केअर सेंटर, रंगूनवाला डेंटल कॉलेज, व्ही केअर फार्मा व मानव सेवा संघ यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला. 300 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून 28 गरजूंची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.