पिंपरी : फकिरभाई पानसरे एज्यूकेशन ट्रस्ट व महापलिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि पुर्णानगर सहयोग मित्रमंडळाच्या वतीने जनजागृती आरोग्य शिबिराचे आयोजन चिखलीतील पुर्णानगर येथे घेण्यात आले.
शिबिरात 225 महिला आणि पुरुषांनी थायरॉईड, हिमोग्लोबीन, अमोनिया, पीसीओडी या तापासण्या केल्या. यावेळी ट्रस्टच्या लोकमान्य होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यानी हे आजार कसे टाळावेत व आजारवर उपाय काय केले पाहिजेत याचे मार्गदर्शन यावेळी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. आभार भास्कर उदार यांनी मानले.