मोफत गॅस जोड

0

सुपे । उज्वला योजनेंतर्गत बारामती येथील सुपे गावातील गरीब कुटुंबाना गॅसचे मोफत कनेक्शन देण्यात आले. अनुदानीत गॅस जोडणी अभियानात पहिल्या टप्प्यातील गॅस जोडणीचे वाटप करण्यात आले. यावेळी बारामती पंचायत समिती सदस्या नीता बारवकर यांच्या हस्ते महिला लाभार्थ्यांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले.

उज्ज्वला योजनेंतर्गत सुपे विभागातून 160 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी 21 लाभार्थ्यांना गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. लाभार्थी कुटुंबांना एचपी गॅस त्याचप्रमाणे इंडियन ऑईल व भारत पट्रोलियम या कंपन्यांकडून गॅस वाटप करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती सुपेचे सरपंच दादा पाटील, उपसरपंच शफीक बागवान यांनी दिली. यावेळी मार्केटकमिटी संचालक शौकतभाई कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य संजय बारवकर, नवनाथ जगताप, एचपी गॅस वितरक संतोष अंबोले, श्रीकांत पानसरे, अमोल तरटे आदी उपस्थित होते.