मोफत नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

0

अविनाश टेकवडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त उपक्रमाचे आयोजन

पिंपर-चिंचवड : माजी नगरसेवक स्व. अविनाश टेकवडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त एच. व्ही. देसाई हॉस्पिटल, महंमदवाडी यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. याच शिबिराप्रसंगी क्लासिकल अ‍ॅक्युपंक्चर यांच्या वतीने सर्व रोगनिदान शिबिरही आयोजित केले होते. या शिबिरातही नागरिकांनी मोठा सहभाग नोंदविला.

नेत्रदानाविषयी जनजागृती
आदित्य बिर्ला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नेत्रदान विभागाच्या वतीने नेत्रदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नागरिकांना नेत्रदानासाठी आवाहन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच कै. अविनाशदादा टेकवडे मित्र परिवाराची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा स्पोर्टस कल्ब, मोहिनी टेकवडे यांनी परिश्रम घेतले.