आमदार महेश लांडगेंचे आवाहन
भोसरी : बेरोजगार तरुणांसाठी एज्यू ब्रीज करिअर अकॅडमीने मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. तरुणांना मोफत नोकरी विषयक संपूर्ण प्रशिक्षण प्रमाणपत्रासहित दिले जाणार आहे. मोफत नोकरी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन, आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. बेरोजगार तरुणांसाठी एज्यू ब्रीज करिअर अकॅडमीने मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. या संस्थेमार्फत बेरोजगार तरुणांना मोफत विविध कोर्सेस शिकविले जाणार आहेत. नोकरी विषयक संपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार असून प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधी 60 दिवसांचा असणार आहे. दररोज चार तास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही आमदार लांडगे यांनी सांगितले.
31 मार्च पर्यंत नावनोंदणी
आमदार लांडगे म्हणाले की, प्रशिक्षण घेऊ इच्छिणार्या तरुणांनी आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी, शीतलबाग येथील जनसंपर्क कार्यालयात नाव नोंदणी करावी. नावनोंदणी सकाळी 10 ते दुपारी दोन या वेळेत करावी. 31 मार्चपर्यंत नावनोंदणी करु शकतात. बारावी पास, पदवीधर, पदवीत्तर, बीए, बी.कॉम, बीसीए, बीसीएस, एमए, एकॉम, एमटेक शिक्षण झालेले विद्यार्थी अर्ज करु शकतात. अर्जासह बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. वयाची अट 18 ते 30 पर्यंत आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संदीप उकाळे यांच्याशी 8830076624, 8055992900 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.