मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

0

बारामती । माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी याबाबत माहिती दिली. सुप्रसिध्द नेत्रचिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारे, डॉ. सचिन कोकणे या शिबीरात रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहेत.

यानंतरच्या तपासण्या व चष्मेदेखील मोफत देण्यात येणार आहेत. रुग्णाच्या निवास, नाश्ता, व भोजनाची सोय फोरमच्यावतीने केली जाणार आहे. हे शिबीर बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली ग्रामीण रुग्णालयात होणार आहे. या शिबीराचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र किंवा शासकीय रुग्णालय तसेच बारामती कसब्यातील राष्ट्रवादीभवन येथे रुग्णांनी नोंदणी करावी, असे आवाहन फोरमच्या वतीने करण्यात आले आहे.