मुंबई । जगभरच्या आणि भारताच्या मोबाईल मार्केटमध्ये मंगळवार, 12 सप्टेंबर हा जबरदस्त धमाक्याचा दिवस आहे. अमेरिकेत ’अॅपल’चा आयफोन 8 लाँच होणार आहे. नेमका हाच मुहूर्त साधून ’अॅपल’ला भारतात टक्कर देण्यासाठी सॅमसंगने 12 सप्टेंबर रोजी दिल्लीत खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नुकताच जगभरात लाँच केलेला आजवरचा सगळ्यात जबरदस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलक्सी नोट 8 ’सॅमसंग’ भारतात उतरवेल, असा अंदाज लावला जात आहे. भारतीय मोबाइल बाजारपेठेवर गेले अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारी सॅमसंग कंपनी आपले स्थान कायम ठेवण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे.
किमतीबाबत उत्सुकता
’सॅमसंग’ने गॅलक्सी नोट 8 ची किंमत अमेरिकेत 59 हजार रुपये ठेवली आहे, तर इंग्लंडमध्ये या फोनची किंमत 71 हजार रुपये आहे. मात्र भारतात या फोनची किंमत किती असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय बाजारपेठेत ’अॅपल’ला शिरकावाचा वाव मिळू नये म्हणून नोट 8 ची किंमत कमी राहील, अशी शक्यता व्यक्त होतेय. भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत साठ ते सत्तर हजारांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
सॅमसंग गॅलक्सी नोट 8 चे फीचर्स
अँड्रॉइड 7.1.1 नॉगट, रॅम 6 जीबी
6.3 इंचााचा डिस्प्ले, गोरिला ग्लास
सुपर अमोल्ड स्क्रीन
ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835
12 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे
8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
10 एक्सपर्यंत झूम फीचर
3,300 एमएएच बॅटरी
वायरलेस चार्जिंग शक्य
इनबिल्ट मेमरीः 64,128, 256 जीबी
मेटल बॉडी; चार आकर्षक रंगात उपलब्ध
‘अॅपल’ आयफोन 8 चे फीचर्स
होम बटन हे डिस्प्ले स्क्रिन मागे किंवा खाली दिले असेल
टच आयडीमध्ये आयरिश स्कॅनिंग
थ्री डी सेंसर टेक्नॉलोजी
ड्युअल लेंस कॅमेरा, वायरलेस चार्जिंग
अॅपल पेन्सिल सपोर्ट
युएसबी-सी चार्जिंग, वॉटर रेझिसटेंस
हाय क्वालिटी इयरपीस
अॅपल नेक्स्ट जनरेशन प्रोसेसर
स्टेन्लेस स्टील आणि ग्लास बॉडी
3 जीबी रॅम आणि 64 जीबा व्हेरिएंट
इंटेलचा क्वॅलकॉम मॉडेल
वायरलेस चार्जिंगचा पहिला आयफोन
अॅपलचा आयफोन 8 सॅमसंग गॅलेक्सी एस8 आणि एस8 प्रमाणेच ’बेझल’लेस असेल. या मोबाइलमध्ये 5.8 इंचांची ओएलइडी डिस्पले स्क्रिन असेल. या मोबाइलच्या फ्रंट कॅमेर्याच्या टॉपवर सेंसर लावला असेल. या मोबाइलमध्ये उभा ड्युअल लेंस रियर कॅमेरा असेल. वायरलेस चार्जिंग फीचर असणारा कंपनीचा हा पहिलाच फोन असेल. या मोबाइलच्या फ्रंट ग्लासमध्ये टच आयडी टेक्नॉलॉजी लागली असेल. अॅपल या फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देणार की नाही, याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. कारण क्वालकॉमच्या या इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरच्या शिपिंगसाठी उशीर होणार आहे. त्यामुळे अॅपल यामध्ये टच आयडी सेन्सर टेक्निक देणार नाही, असा अंदाज लावला जात आहे. या मोबाइलची किंमत अंदाजे 55000 ते 71000 पर्यंत असणार आहे.