मोबाईलच्या अनावश्यक वापरामुळे तरुणांमध्ये खिन्नता, दिशाहिनता

0

कवी प्रा. वा.ना.आंधळे यांचे प्रतिपादन ; जिल्हा वंजारी युवा संघटना व वंजारी सेवासंघातर्फे गुणगौरव

जळगाव – वर्तमानात बहुसंख्य विद्यार्थी मोबाईलचा अनावश्यक वापर करतात. त्यातून तरुण हा खिन्नतेमुळेच नकारात्मक भावनांच्या जाळयात अडकून वैफलग्रस्त होतो. परिणामी प्रगतीच्या दिशा बंद होतात. प्रतिकुल परिस्थिती असतांनाही सकारात्मक दृष्टीकोन अंगिकारुन जे यश मिळतात ते जीवनात यशस्वी होतात, समाजाच्या कौतुकास पात्र ठरतात, असे प्रतिपादन कवी प्रा. वा.ना.आंधळे यांनी केले.

जिल्हा वंजारी युवा संघटना व वंजारी सेवासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रविण गिते, समाजभुषण पुरस्कारप्राप्त अंजली केंद्रे, वरणगाव नगराध्यक्ष सुनिल काळे, अनिल फड, महावितरण कार्यकारी अभियंता विजयानंद काळे आदी उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर गणेश घाटे, के.बी.पाटील, पन्नालाल लाड, चंद्रकांत लाड, राजेंद्र पाटील, किरण पोळ, सुशीला पाटील, वंदना पालवे, प्रिती चकोर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक नगरसेवक प्रशांत नाईक यांनी कले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी क्रांतीलाल सानप यांच्या आई वडीलांच्या स्मृतीपित्यार्थ इयत्ता 10 वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मयुर विठ्ठल देशमुख व इयत्ता 12 वीत उत्तीर्ण झालेल्या मोहीत राजेंद्र नाईक या दोघांना सायकल भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सदिच्छा भेट देवून गुणवंत विद्याथ्यार्ंसह समाजबांधवांशी हितगुज केले. यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष तसेच नगरसेवक प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव वंजारी, सचिव सोनवणे, योगेश घुगे, उमेश आंधळे, चंदुलाल सानप, किशोर पाटील, अजय नाईक, गणेश वंजारी, सुधीर नाईक, राहूल वंजारी, सुरेश वंजारी, विलास घुगे, गोविंदा सांगळे यांनी परिश्रम घेतले.

यांचा समाजभुषण, समाजवैभव पुरस्काराने गौरव
कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे समाजातल्या यशवंत, किर्तीवंतांचाही समाजभुषण व समाजवैभव पुरस्कार देवून गौरविण्यात आला. यात हभप अंजली अर्जून केंद्रे, उदगिर ता.लातूनर यांचा हरिकिर्तन मॅरेथान स्पर्धेत जागतिक विक्रम केल्या प्रित्यर्थ तसेच अरुण बिसन सानप, सोमनाथ सानप यां नात्य व सिने क्षेत्रातील यशस्वीतेबद्दल तसेच हिमांशू बढे या विद्यार्थ्यांचा एमपीएससीच्या च्या परिक्षेत भारतातून चवथा व महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गौरविण्यात आले.