मोबाईलसह रोकड लुटणारे अल्पवयीन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

पारोळा : शहरातील सत्यनारायण मंदिराजवळ 8 रोजी आमदार चिमणराव पाटील यांचे नातेवाईक अमोल पाटील (रा.मुंदाणे) यांना तीन चोरट्यांनी लुटले होते. त्यांच्याकडून 10 हजारांचा मोबाईल व 1200 रुपये तिघांनी हिसकावून घेतले होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
अमोल पाटील हे 8 रोजी रात्री पारोळा येथून मुंदाणे येथे घरी जात असताना, तिघांनी त्यांना लुटले होते. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस तपासात तीन विधीसंघर्षग्रस्त बालके या गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फिर्यादीचा मोबाईल व 500 रुपये असा मुद्देमाल तिघांकडून पोलिसांनी जप्त केला.