मोबाईल उचलण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली ; 11 जखमी

0

जळगाव- रिक्षाचा हँडलवर ठेवलेला मोबाइल रिक्षाचालकाच्या पायाजवळ पडल्याने त्याला उचलण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकांचा नियंत्रण सुटून शेतमजुरांना घेवून जाणारी रिक्षा उलटल्याची घटना गुरुवारी सकाळी सकाळी 9 वाजेच्या सुमारास किनगाव ते ममुराबाद दरम्यान घडली. या अपघातात 11 शेतमजुर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नुरजहा लालखा तडवी (वय 45) भुगाबाई रेहमत तडवी (वय 45), जरीना रहमत तडवी वय 20 आबेदा बहादूर तडवी (वय 40), नथाबाई जहांगिर तडवी (वय 45), रिक्षा चालक रसिद हबीब तडवी (वय 25), शकीला तडवी वय 20, हर्षद सिंकदर तडवी वय 20, रेहमत मुबाकर तडवी वय 40, शेगम निजाम तडवी वय 50, मुमताज तडवी वय 16 सर्व रा. किनगाव ता. यावल अशी जखमींचे नाव आहे. सर्व जण रिक्षातून किनगावहून ममुराबादकडे जात होते. यादरम्यान रिक्षात खाली पडलेला मोबाईल उचलण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.