जळगाव। तरूणाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढणारा चोरटा शेख तौसीफ शेख युनूस (रा.तांबापूरा) याला रविवारी जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पकथकाने सापळा रचुन पकडले आहे. दरम्यान, त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. 26 जून रोजी सकाळी 10 वाजता गणेश कॉलनीत राहणारे विजय राजपूत हे नवीन बसस्थानक परिसरातून मोबाईलवर बोलत पायी चालत होते. यावेळी त्यांच्या मागुन येत तौसीफ याने हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता.
चाळीस हजार रूपयाचा मोबाईल चोरला
या संदर्भात राजपूत यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर गुन्हे शोध पथकाचे काम सुरू होते. सोमवारी पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड, अलताफ पठाण, रवी नरवाडे, अमित पाटील, नाना तायडे, शेखर पाटील, राजेश मेढे यांच्या पथकाला तौसीफ बद्दल गुप्त माहिती मिळाली. तौसीफ याने तीन दिवसांपूर्वी गणेशनगर येथील एका घरातून मोबाईल व पैसे चोरल्याच्या संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने आकाशवाणी चौकात सापळा रचला. तौसीफ तांबापूरातून आकशवाणी चौकात आल्याबरोबर त्याला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून खाक्या दाखवताच त्याने एक चोरीचा मोबाईल काढून दिला. हा महागडा मोबाईल बसस्थानकाजवळुन चोरल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी राजपूत यांना पोलिस ठाण्यात बोलावनू घेतले. हा आपलाच मोबाईल असल्याचे राजपूत यांनी सांगीतले. तौसीफवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. राजूपत यांचा 40 हजार रूपयांचा मोबाईल तौसीफने चोरला होता. दरम्यान, महिनाभरानंतर मोबाईल परत मिळाल्यामुळे राजपूत यांनी पोलिस ठाण्यात आनंद व्यक्त केला.