मोबाईल चोरट्यांकडून तरुणावर वार

0

पिंपरी-चिंचवड : भोसरी येथील बोर्‍हाडेवाडी येथील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मोबाईल न दिल्याने चोरटयांनी धारधार शस्त्रांनी तरुणावरच वार केले. गोविंद भोसले (वय 22, रा. बोर्‍हाडेवाडी मोशी) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) रात्री साडेनऊ वाजता घडली.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भोसले घरी जात असताना बोर्‍हाडेवाडी येथे दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आल्या. त्यांनी भोसले यांच्या हातातून फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्या हातातील धारदार शस्त्राने डोक्यात, छातीवर व पायावर वार केले व त्यांचा 2 हजार रुपये किंमतीचा फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.