जळगाव । शहरातील न्यू काळे मटन हॉटेल सामोरून 26 मार्च रोजी रात्री 22.30 वाजेच्या सुमारास मोबाईल चोरी गेल्या प्रकरणी शहर पोलीसांनी चोरट्यास 14 मे रोजी अटक केली. आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी रात्री 22.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी सुरेश बाजीराव पाटील (वय-45,रा. महात्मा फुले नगर, उंदीरखेडा रोड पारोळा) हे शहरातील न्यू काळे मटन हॉटे समोरून चोरटा परवेज अली उर्फ डालर मोहम्मद शकील (वय-21, रा. अतिष मेंबर) याने मोबाईल फिर्यादीच्या खिश्यातून 1 हजार रूपये रोख आणि 16 हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरला होता. याप्रकरणी सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोट्यास आज एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले.