यावल । शहरात शुक्रवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणार्यास नागरीकांनी रंगेहात पोलिसांना पकडून दिले ही घटना सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. सदरील चोरट्यांने चोरी केलेले मोबाईल आपल्या साथीदाराच्या मदतीने लंपास केले आहे. शुक्रवारी यावलचा आठवडे बाजाराचा दिवस होता तर बाजारात सांयकाळी गर्दी होत असते, तेव्हा याच गर्दीचा फायदा घेत शहरातील खाटीक वाड्यातील रहिवासी व ‘चोर आरिफ’ म्हणून प्रसिध्द असलेला आरीफ रशीद खाटीक हा साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या एका साथीदारा सोबत फिरत होता. तेव्हा बाजारातुन त्याने पद्माकर पाटील (रा. वड्री ता. यावल) यांचा साडेबारा हजार किंमतीचा, योगेश साहेबराव पाटील (रा. चुंचाळे) यांचा साडे आठ हजाराचा व संजय भोईटे (रा. यावल) यांचा 12 हजार रूपये किंमतीचा असे तीन मोबाईल लांबवले. तेव्हा पुन्हा एकाचा मोबाईल लांबवतांना त्यास रंगेहात पकडण्यात आले. तेव्हा या धरपकडीत त्याने चोरी केलेले तीघे मोबाईल आपल्या एका साथीदारस दिले व गर्दीचा फायदा घेत आरीफचा साथदार तेथून पसार होण्यात यश आले. मात्र नागरकांनी आरीफ यास थेट पकडून पोलिसठाण्यात आणले तेव्हा उशीरा पर्यन्त तक्रार घेण्याचे काम चालू होते.