भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल
भुसावळ – बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी योगेश भगवान पाटील (23, गांधीनगर, भुसावळ) यास न्या.बोराडे यांनी 15 हजार रुपयांचा जात मुचलका अशी शिक्षा सुनावली. तपासात आरोपीकडून 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपअधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कै.सतीश देशमुख व उपनिरीक्षक रामलाल साठे, नाईक शिवदास साठे यांनी केला होता. न्यायालयात सरकारतर्फे अॅड.चोरडीया यांनी बाजू मांडली. खटल्याकामी केसवॉच एएसआय दिलीप निकम, सुनील अहिरे, जितेंद्र साळुंके यांनी सहकार्य केले.