मोबाईल चोर पोलीसांच्या ताब्यात

0
चाळीसगाव– चाळीसगाव बस स्थानकातुन बस मध्ये चढत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरणा-या मालेगाव येथील चोरट्यास चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे.
        याबाबत माहिती अशी काशीनाथ राघो ठाकुर रा नेर ता चाळीसगाव हे दिनांक २/९/२०१८ रोजी रात्री ९-३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव बस स्टॅंड वर ईन्दोर बस मध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या शर्टाच्या खिशातील १० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरुन नेला होता तसा गुन्हा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता.
     यातील आरोपीचा शोध पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असताना चाळीसगाव धुळे रस्त्यावरील वाय पॉईंट शेख अल्ताफ शेख मुनीर (३१) रा मदनी नगर हा संशयास्पद दिसल्याने डी बी चे हवालदार बापूराव भोसले, पो कॉ राहुल पाटील, गोवर्धन बोरसे, तुकाराम चव्हाण, संदीप तहसीलदार, विनोद भोई यांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने बस स्टॅंड मधुन वरील मोबाईल चोरी केल्याची कबुली देवुन चोरीचा मोबाईल काढुन दिला त्यास अटक करुन त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.