जळगाव। शनिपेठ परिसरातील रिधूर वाड्यात राहणार्या मनोज एकनाथ चौधरी यांच्या घराच्या छतावर असलेल्या बीएसएनएल टॉवरला रविवारी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली.
आगीने रौद्ररूप धारण केल्याने रिधूर वाड्यात धावपळ सुरू झाली होती. तर चौधरी यांच्या घरातील नागरिकांनी सामान व सिलेंडर घराबाहेर नेवून ठेवले होते.