बळसाणे । एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु असून मोठ्या प्रमाणात आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु आहे. डिजीटल इंडिया ही संकल्पना साकार करण्यासाठी देश विदेशातील टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नानाविध सुविधांचा लाभ देऊन जीवघेणी स्पर्धा सुरू केली आहे. असे असतांना बीएसएनएल मात्र सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरत आहे. बळसाणेसह माळमाथा परिसरातील बिएसएनएलच्या ग्राहकांना रेंजसाठी डोंगरावर, झाडावर, उंच टेकडीवर भ्रमणध्वनी ग्राहक मात्र डोंगरावर, झाडावर, उंची टेकडीवर चढावे लागत आहे. बळसाणे, दुसाणे, हाट्टी, ऐचाळे, इंदवे, लोणखेडी, छावडी, अमोदे, उंबट, सतमाने, कढरे, आगरवाडा, घानेगाव, मसाले आदी गावात बीएसएनएलची सेवा कुचकामी ठरत असल्याने नागरिकांच्या हातातील महागडे मोबाईल केवळ शोभेचे वस्तू बनले आहे.
संपर्क तुटल्याने होतेय चिडचिड
भारत संचार निगमसह विविध खासगी कंपन्यांचे बळसाणे तीर्थासह माळमाथा परिसरात पूर्णपणे दुर्लक्ष असून हजारोंच्या संख्येने ग्राहक असतांना सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त आहे. संपर्कासाठी झाडावर, छतावर चढून रेंजचा शोध घेतांना अनेक दिसत आहे. महत्वाच्या प्रसंगी रेंज अभावी नागरिकांचे हाल होत आहे. बोलता बोलता संपर्क तुटत असल्याने अनेकांमध्ये चिडचिड होत असल्याचे दिसते.
वैद्यकीय सेवा वेळवर नाही
वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने आपात्कालीन मदत केंद्र सुरू केले असून 108 सारखी हेल्पलाईन सुरू केली आहे. धुळे, नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदीवासी बांधव वास्तव्यास आहे. आपतकालीन परिस्थितीत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क होत नसल्याने अनेकांना वेळेवर उपचारही मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पर्यटकांमध्ये नाराजी
बळसाणे जैनाचे तीर्थक्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यातून मुक्कामाला भाविक बळसाणे तीर्थावर राहत असल्याने त्या पर्यटकांना रात्री अपरात्री परिवारा सोबत संपर्क साधने कठीण होवून जाते त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. शहरी भागात सुविधांचा ‘ओव्हरडोस’ पाजणार्या टेलीकाँम कंपन्यांनी ग्रामीण भागातही लक्ष घालावे अशी अपेक्षा सरपंच दरबारसिंग गिरासे, महाविर जैन यांनी व्यक्त केली आहे.